Beed Rain Update: बीडकरांसाठी पुढचे तीन तास काळजीचे.. मॉन्सून दाखल, निसर्गाचा कोप

Beed Rain : आज पुन्हा एकदा मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सतर्कने दिलेल्या माहितीनुसार राज्याच संततधारेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहेत.
rain update
rain updateesakal

काल महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले. पुणे, सोलापूर, सातारा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुण्यात तर रस्त्यांना नद्याचे स्वरुप आले होते. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे.

दरम्यान आज पुन्हा एकदा मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सतर्कने दिलेल्या माहितीनुसार राज्याच संततधारेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहेत. (Maharashtra Rain Update)

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. तर बीड, छ. संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, साताऱ्यात विजांसह पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई ते अहमदाबादला जोडणाऱ्या महामार्गावरील रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या भागात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाल्याने तापमानाचा पारा खाली आला आणि रहिवाशांना उष्मा आणि दमट हवामानापासून दिलासा मिळाला.

rain update
Jalgaon Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने शेतशिवारात दाणादाण! चोपडा तालुक्यात 2 म्हशी ठार

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रस्त्याचा काही भाग खचला, त्यामुळे रविवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक चार तासांपेक्षा जास्त काळ विस्कळीत झाली.

पुण्यात तर पावसाने सर्व रस्ते बंद केले होते. वाहने रात्रभर रस्त्यावर उभी होती. तर भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये मॉन्सून सरींनी जोरदार सलामी दिली. रविवारी (ता. ९) रात्री बारामतीमध्ये १२६ मिलिमीटर, तर इंदापूरमध्ये तब्बल १४५ मिलिमीटर, अशा विक्रमी पावसाची नोंद झाली.

rain update
Mumbai Rain: मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, हवामान विभागाने दिला इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com