लातूर : साहित्य संमेलन अध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार

तीन दिवसीय साहित्य संमेलनाच्या तारकाही घोषित होण्याची शक्यता
Maharashtra Udayagiri College
Maharashtra Udayagiri College

उदगीर (जि.लातूर) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या (Maharashtra Udayagiri College) प्रांगणात होऊ घातलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.१) येथील उदयगिरी महाविद्यालयात अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षच्या नावा सदर्भात व साहित्य संमेलनाच्या तीन दिवशीय तारखा संदर्भात सविस्तर चर्चा झाली. संमेलनाध्यक्षांच्या नावाची घोषणा रविवारी (ता.२) होऊ शकते अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे शाखाखा अध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दिली आहे.

Maharashtra Udayagiri College
'बाप बाप होता है'; ब्रेट लीचा खतरनाक यॉर्कर; व्हिडिओ व्हायरल

शनिवारी येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ दादा गोरे, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सदस्य प्रा मिलिंद जोशी, विलास मानेकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव माजी आमदार मनोहर पटवारी, संस्थेचे उपाध्यक्ष तथा मसापचे शाखा अध्यक्ष श्री तिरुके, श्रीकांत मध्वरे, रमेश अंबरखाने, दिनेश सास्तुरकर, प्राचार्य आर आर तांबोळी, उपप्राचार्य प्रा डॉ राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती.

होवू घातलेले ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे तोन दिवसीय संमेलन घेण्याचे या बैठकीत ठरले. उदयगिरी नगरीमध्ये हे साहित्य संमेलन दर्जेदार व उल्लेखनीय होण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली शिवाय या साहित्य संमेलनाच्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाल्यानंतर निश्चित झालेल्या नावाची घोषणा रविवारी (ता.२) करण्यात येणार असल्याचे सूतोवाच यावेळी श्री तिरुके यांनी केले आहे. याशिवाय साहित्य संमेलनाच्या तारखा निश्चित करून त्याची घोषणा अध्यक्षपदाच्या नावा सोबतच होऊ शकते अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Udayagiri College
सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, निर्बंध वाढणार : राजेश टोपे

दरम्यान शनिवारी झालेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीस महामंडळाचे काही सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत. जे सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत ते रविवारी उदगीरात दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावाची चर्चा होऊन त्यात महामंडळाच्या सर्व सदस्यांच्या एकमताने निवड झालेल्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

स्वागताध्यक्षपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा

यावर्षी उदगीर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदासाठी राजशिष्टाचार अनुसार व उदगीरला राज्यमंत्री पदाची संधी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा चालू आहे. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी व परिसरातील नागरिक त्यांच्या नावाची चर्चा करत असताना दिसून येत आहेत. स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी राज्यमंत्री बनसोडे तर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मसापचे शाखा अध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी स्वीकारून हे साहित्य संमेलन न भूतो न भविष्यती करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी साहित्यिक व नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com