भोकर (जि. नांदेड) : अशाेक चव्हाणांचे रॉकेट सुसाट | Election Results 2019

Ashok chawhan
Ashok chawhan

नांदेड - अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या भाेकर या मतदारसंघात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशाेकराव चव्हाण यांचे भवितव्य पणाला लागले हाेते. लाेकसभा निवडणुकीतील पराभव अशाेकरावांच्या जिव्हारी लागलेला हाेता. सकाळी साडेदहा मिळालेल्या माहितीनुसार भाेकर मतदारसंघातील अाठवी फेरी संपली तेव्हा अशाेकराव चव्हाण ३४ हजार ५७६ मतांनी आघाडीवर हाेते. त्यांना या फेरीअखेर एकूण ४९ हजार १३४ एवढी मते मिळाली हाेती.

या मतदारसंघात सत्ताधारी भाजपचे खासदार व अशाेक चव्हाणांचे कट्टर विराेधक प्रतापराव चिखलीकर यांनी माजी आमदार बापूसाहेब गाेरठेकर यांना भाजपमध्ये आणुन अशाेक चव्हाणांसमाेर उभे केले हाेते. लाेकसभेतील पराभवानंतर अशाेक चव्हाण यांनी पक्षांतर्गत नाराजी मिटवुन वाडी, वस्त्या व खेडेगावांना भेटी दिल्या हाेत्या. काही चुकले असेल तर माफ करा, मला आपल्या सेवेची संधी द्या, अशी भावनिक साद अशाेकरावांनी मतदारांना घातली हाेती. दुसरीकडे नांदेड उत्तार या मतदारसंघात कॉँग्रेसचे नेते, माजी मंत्री व अशाेकरावांचे खंदे समर्थक डी.पी.सावंत हे पिछाडीवर आहेत. अत्यंत नवख्या असलेल्या शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांनी त्यांनी चांगली लढत दिली आहे.

नांदेड दक्षिण या मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे माेहन हंबर्डे यांनी दाेन हजार ५४३ मतांची अाघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या राजश्री पाटील, तर अपक्ष दिलीप कंदकुर्ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नायगाव मतदारसंघात भाजपचे राजेश पवार २७ हजार मतांनी अाघाडीवर अाहेत. मुखेड मतदारसंघात भाजपचे तुषार राठाेड चार हजार १६९ मतांनी आघाडीवर आहेत.

हदगाव मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार बाबूराव कदम काेहळीकर १३ हजार ८०५ मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेसचे जवळगावकर व तिसऱ्या शिवसेनेचे विद्यमान अामदार आष्टीकर आहेत. किनवट मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रदीप नाईक आघाडीवर आहेत. लाेहा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेना उमेदवार मुक्तेश्वर धाेंडगे यांनी आघाडी घेतली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com