वसमत (हिंगोली) : तीन उमेदवारांत काट्याची लढत; शिवसेना मारणार बाजी? | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

वसमत (हिंगोली) - येथे मतमोजणीची चार फेऱया झाल्या असून, शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांनी १४३६७, वंचित आघाडीचे मुनीर पटेल यांनी ६०८७, राष्ट्रवादी कॉग्रेसचे राजू नवघरे १२०८० आणि अपक्ष अॅड.शिवाजीराव जाधव यांनी १३३०६ मते घेतली. चौथ्या फेरीअखेर शिवसेनेचे मुंदडा १०६१ मतांनी आघाडीवर असून, येथे मुंदडा, नवघरे आणि जाधव यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळत आहे.

येथे भाजपचे नेते अॅड. शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले होते. निवडणूक रिंगणात असलेल्या 21 पैकी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. या ठिकाणी आता शिवसेनेचे उमेदवार तथा आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादीचे चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, वंचित आघाडीचे मुनीर पटेल तर अपक्ष म्हणून अॅड. जाधव निवडणूक रिंगणात आहेत.

याप्रमुख उमेदवारांसह इतर आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतविभाजन होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. निकालही तसाच येत आहे. दरम्यान, मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Vasamat trends middle phase