Maratha Kranti Morcha : नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठ्यांना आरक्षण नाही म्हणतो..!

सचिन शिवशेट्टे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

उदगीर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. नऊ) करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला येथे मोठा प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाने शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. 

मराठा समाजातील पुढारी, युवक, महिला सकाळी दहा वाजल्यापासून शिवाजी चौकात एकञ येत `नागपुरचा पोपट काय म्हणतो, मराठ्यांना आरक्षण नाही म्हणतो`, अशा मुख्यमंञी विरोधी घोषणा देत होते.

बॅरिकेट्स लावुन रस्ते चारही बाजुने बंद करण्यात आली आहेत तर पंचायत समीती आवारात आंदोलकासाठी अल्पउपहाराची सोय करण्यात आली आहे. शहरातील अडत बाजार, भाजी मंडई, नगरपरिषद कॉम्पलेक्स, सकाळपासुन कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालय, सुट्टी देण्यात आली आहे.तर शासकीय कर्मचार्‍याचा संप असल्यामुळे कार्यालयही बंद आहेत. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: #MaharashtraBand Maratha Kranti Morcha : agitation in udgir