Maratha Kranti Morcha : हिंगोलीत मोठा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

हिंगोली : हिंगोली शहरामध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. तर शहरातील नांदेड नाका भागात आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडवली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदमुळे व्यापाऱ्यांनी व्यापारी प्रतिष्ठाने उघडलीच नाही सकाळपासूनच सकल मराठा समाजातील तरुण रस्त्यावर उतरले होते. शहरामध्ये ठिकठिकाणी तरुणांचा जमाव एकत्र आला आहे. बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट असून केवळ दुचाकी वाहने रस्त्यावरून धावू लागली आहेत. ऑटो सह महामंडळाच्या बस गाड्या व खासगी बसगाड्या देखील बंद आहेत.

शहरातील नांदेड नाका भागात तरुणांनी रस्त्यावर ठाण मांडले असून दुचाकी वाहने रस्त्यावर उभी करून रस्ता आडवला आहे. हिंगोली आगारातील एकही बस सोडण्यात आले नाही आगारातील दोन्ही  प्रवेश द्वार बंद झाले असून बसेस आगारांमध्ये उभ्या करत आले आहेत.

Web Title: #MaharashtraBandh Hingoli huge support