Maratha Kranti Morcha : बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

बीड - मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून जागोगाजी चक्काजाम आंदोलने सुरु आहेत. माजलगाव, वडवणी व घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे आंदोलकांनी रुग्णवाहिकेला रस्ता करुन दिला. 

बीड - मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून जागोगाजी चक्काजाम आंदोलने सुरु आहेत. माजलगाव, वडवणी व घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे आंदोलकांनी रुग्णवाहिकेला रस्ता करुन दिला. 

गुरुवारी सकाळ पासून रस्ते आणि व्यापारपेठा सुनसान दिसत आहेत. बससेवा पुर्णपणे ठप्प असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. दरम्यान, माजलगाव चौकात हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र येत चक्काजाम आंदोलन सुरु झाले. याच वेळी रुग्णवाहिका आल्यानंतर आंदोलकांनी काही क्षणात वाट करुन दिली. तर, वडवणी येथे युवकांनी रस्त्यावर अर्धनग्न होत चक्काजाम सुरु केला. यावेळी रस्त्यावरच टायर पेटविण्यात आले. याच वेळी रुग्णवाहिका बीडच्या दिशेने जात असताना जळते टायर दुर करत रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यात आली. घाटनांदूर येथील चौकात चक्काजाम सुरु असताना आलेल्या रुग्णवाहिकेलाही वाट करुन देण्यात आली. जिल्ह्यात शाळा - महाविद्यालयांना सुटी घोषीत केली आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनेक ठिकाणी आंदोलक बैलगाड्यांसह रस्त्यावर येऊन चक्काजाम करत आहेत. नेकनूर, विडा येथेही टायर जाळल्याच्या घटना घडल्या.

संबंधित बातम्या :
Maratha Kranti Morcha मराठवाड्यात कडकडीत बंद 
Maratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा
Maratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात
Maratha Kranti Morcha जुन्नरला सकाळपासूनच कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha: नांदेड जिल्ह्यात शांततेत बंद; पोलिस अधीक्षक रस्त्यावर
Maratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'
Maratha Kranti Morcha : नागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा
Maratha Kranti Morcha : भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद
Maratha Kranti Morcha परभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर
Maratha Kranti Morcha अमरावतीत कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha : हिंगोलीत मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद
Maratha Kranti Morcha: जालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम
Maratha Kranti Morcha पिरंगुटमध्ये मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha: औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली
Maratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम

Web Title: maharashtrabandh maratha kranti morcha bandh Chakkajam at the bead district