Maratha Kranti Morcha : घोणसी, जळकोट, तिरुका येथे मराठा आरक्षणासाठी मराठा युवक रस्त्यावर 

शिवशंकर काळे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जळकोट (लातूर) - जळकोट शहरासह तालुक्यातील घोणसी, तिरुका, चेरा, गुरुवारी (ता. 9) सकाळपासून सकल मराठा बांधवाकडून शहरातील शिवाजी चौक येथून ते बसस्थानका पर्यत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कुणकी  चौकात आल्यावर आंदोलकांनी सराकरच्या विरुद्धात घोषणा देत सर्व वाहनांना अडविण्यात आले. शहरातील सर्व दुकाने बंद ठेऊन सर्व धर्मियांनी या आंदोलनाला पाठिंबाच दिल्याचे दिसून येत आहे. हा बंद सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे. या रस्त्यावरून फक्त रुग्णवाहिकेला सोडण्यात येत असून बाकी कुठल्याही वाहनांना जाऊ दिले जात नाही. 

फडणवीस सरकारचा निषेध करीत या मोर्च्याला अनेकांनी भाषणे केली. बंद शांततेत पार पडवा यासाठी चोख आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त  पोलीस निरीक्षक मोहमद्द रफी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे.

Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha : latur bandh update