Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

बीड - बीड तालुक्यातील पाटेगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणाने मराठा अरक्षणासाठी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.९) रात्री उशीरा उघडकीस आली. आरक्षणप्रश्नी यापूर्वी जिल्ह्यात आत्तापर्यंत चौघांनी आपली जीवनयात्रा संपविली असून आरक्षणासाठीचा हा जिल्ह्यातील पाचवा बळी ठरला आहे. 

बीड - बीड तालुक्यातील पाटेगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणाने मराठा अरक्षणासाठी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.९) रात्री उशीरा उघडकीस आली. आरक्षणप्रश्नी यापूर्वी जिल्ह्यात आत्तापर्यंत चौघांनी आपली जीवनयात्रा संपविली असून आरक्षणासाठीचा हा जिल्ह्यातील पाचवा बळी ठरला आहे. 

दिगांबर माणिक कदम (रा.पाटेगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. दिगांबर कदम हा अल्पभूधारक शेतकरी असून बुधवारी आई- वडील व पत्नी शेतात होते. सायंकाळी घरात आडूला दोरीने गळफास घेऊन दिगंबरने आत्महत्या केली. रात्री कुटुंबीय शेतातून परतल्यावर त्यांना दिगंबरचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मयत दिगंबरच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात मराठा अरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. यावेळी तहसीलदार अविनाश शिंगटे दाखल झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कदम कुटुंबियास मदतीची मागणी लावून धरली होती. मयत दिगांबरच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

शासनाकडून आर्थिक मदतीचे आश्वासन
अल्पभुधारक शेतकरी दिगंबर माणिक कदम यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठवरून त्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्यावर नातेवाईकांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्याशिवाय अंत्यविधी न करण्याची भूमिका घेतली होती. याची माहिती मिळताच तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी घटनास्थळी भेट देवून सर्व गोष्टींची शहानिशा करून वरीष्ठांशी बोलून शासनाच्या वतीने कदम कुटूंबाला १० लाख रूपये आर्थिक मदतीचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला अन्‌ अंत्यविधीचा मार्ग मोकळा झाला

Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha : Suicide For Maratha Reservation