उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी वाहतूक पूर्णपणे बंद

तानाजी जाधवर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद विभागाने जिल्ह्यातील सहा आगाराच्या  सर्व ४५९ बस गुरुवारी आगाराच्या बाहेर न काढण्याचा तसेच बुधवारी मुक्कामी गेलेल्या बसही संबधित गावाऐवजी जवळच्या आगारात लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे दळणवळणावर मोठा परिणाम होणार असला तरी बंदची घोषणा खुप अगोदर केल्याने व आंदोलनाची परिस्थितीची कल्पना असल्याने प्रवाशी बाहेर पडण्याची शक्यताही कमी आहे.  

उस्मानाबाद : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने हा पवित्रा घेतल्याच सांगण्यात आले. जिल्ह्यातील ४५९ एसटी बसची चाके आज ठप्प राहणार आहेत. 

आंदोलना दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बस लक्ष्य होत अाहेत. त्यातून होणारे नुकसान भरुन न निघण्यासारखे असते. ते टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा आगारातील सर्व ४५९ एसटी बस गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २४ जुलैला  मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान हिंसक घटना होऊन राज्यात ३५३ बसेसची जाळपोळ व तोडफोड करण्यात आल्याने एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातीलही जवळपास २१ बसेसची तोडफोड करण्यात आली.या सर्व पार्श्वभूमीवर यामुळे या बंदच्या घोषणेबरोबर एस.टि. महामंडळानेही बंदची घोषणा केल्याचे दिसुन येत आहे.

उस्मानाबाद विभागाने जिल्ह्यातील सहा आगाराच्या  सर्व ४५९ बस गुरुवारी आगाराच्या बाहेर न काढण्याचा तसेच बुधवारी मुक्कामी गेलेल्या बसही संबधित गावाऐवजी जवळच्या आगारात लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे दळणवळणावर मोठा परिणाम होणार असला तरी बंदची घोषणा खुप अगोदर केल्याने व आंदोलनाची परिस्थितीची कल्पना असल्याने प्रवाशी बाहेर पडण्याची शक्यताही कमी आहे.  

जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, भूम, परंडा व उमरगा असे एकूण सहा आगाराकडे मिळून एकूण ४५९ बस असून त्या दररोज २२५२ फेऱ्यांद्वारे १ लाख ६६ हजार १५७ किलोमीटर धावतात. बसचे नुकसान नको म्हणून एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने या सर्व बस गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने एसटी महामंडळाचा एक दिवसाचा तोटा होणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: #MaharashtraBandh ST transport close in Osmanabad