चक्क मृतांना दाखविले रोहयो मजूर; ग्रामरोजगार सेवकाची सेवासमाप्ती

शासकीय नोकरदार व मृतांना मजूर दाखवून अपहाराचा प्रकार
Fraud crime news
Fraud crime newsesakal

बीड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात चक्क शासकीय नोकरदार व मृतांना मजूर दाखवून त्यांची हजेरी पत्रकावर हजेरी नोंदवून अपहाराचा प्रकार शेकटा (ता. गेवराई) येथे समोर आला होता. या प्रकरणी ग्रामरोजगार सेवकाची सेवा समाप्ती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले.

शेकटा (ता. गेवराई) ग्रामपंचायत अंतर्गत हाती घेतलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात महादेव काशिनाथ शेंबडे (मृत), बाबा जारेखॉं पठाण (मृत), नामदेव महादेव शेंबडे (मृत), आरुधा विठ्ठल शेंडकर (नोकरदार), शिवाजी बाबूराव पारेकर (नोकरदार), हरिभाऊ भानुदास महानोर (मृत), विमल हरिभाऊ महानोर (मृत), शहाबाई गौतम कुडूक (मृत), शांताबाई गौतम कुडूक (मृत), धोंडाबाई रामभाऊ हाके (मृत), बाबूराव सोनाजी शेंबडे (दिव्यांग), मथुराबाई बळीराम शेंबडे (मृत), सुमित्रा धर्मराज गर्जे (नोकरदार), ज्ञानोबा शिवराम साळवे (मृत), साहेबराव काशिनाथ शेंबडे (मृत), सुरेखा भागवत महानोर (नोकरदार), धोंडीराम यादवराव माने (मृत), सुर्यभान यादवराव माने (मृत), बाळू रामनाथ माने (नोकरदार) यांची नावे हजेरीपत्रकावर टाकून शासन निधीची अफरातफर केल्याचा अहवाल दीपक जोगदंड, अरुण बुरांडे, स्वाती कुटे यांच्या समितीने दिला होता.

या प्रकरणातील एक लाख ९२ हजार ७८० रुपये अपहारात दाखवून अपहारास जबाबदार तत्कालीन गटविकास आधिकारी अनिरूद्ध सानप, सहाय्यक लेखाधिकारी बी. आर. कुलकर्णी, ग्रामसेवक एस. एस. वाघमारे व ग्रामरोजगार सेवक रामदास शेंबडे व ऑपरेटर देशपांडे यांना दोषी धरण्यात आले होते. मात्र, यातील ग्रामरोजगार सेवक रामदास शेंबडे यांच्यावर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली.

इतर दोषींचे काय?

या प्रकरणात नोकरदारांची नावेही मजुरांच्या यादीत आहेत. त्यांच्या कागदपत्राशिवाय मजुरांच्या यादीत नावे शक्य नाहीत. तसेच, त्यांच्या खात्यावर मजुरीची रक्कम आली. या प्रकरणात आता त्यांच्यावर कारवाई काय? व या प्रकरणातील इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार? असा सवाल या प्रकरणातील तक्रारदार डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com