जालना : चार नगरपंचायतींवर येणार महिलाराज

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, घनसावंगीचे खुल्या प्रवर्गाला
Mahila Raj will come four Nagar Panchayats
Mahila Raj will come four Nagar Panchayats

जालना : जिल्ह्यातील नवनिर्मित तीर्थपुरीसह पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईतील मंत्रालयात गुरुवारी (ता.२७) काढण्यात आले. घनसावंगी वगळता उर्वरित चारही नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या नगरपंचायतीवर आता महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mahila Raj will come four Nagar Panchayats
नांदेडला गुरुवारी ४५७ कोरोनाबाधित

जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुका दोन टप्प्यात नुकत्याच पार पडल्या. यात नगरपंचायतीतील राजकीय चित्र स्पष्ट झाले. यात घनसावंगी व तीर्थपुरीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. तर बदनापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. मंठ्यात शिवसेनेने सत्ता काबीज केलेली आहे. जाफराबादेत मात्र त्रिशंकू अवस्था झाल्याने सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात आहेत. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची उत्सुकता ताणली गेलेली होती. मुंबईच्या मंत्रालयातील नगरविकास विभागात राज्यभरातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये मंठा, जाफराबाद, बदनापूर तसेच तीर्थपुरी येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. घनसावंगी येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे घनसावंगीत नगराध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी मोठी चुरस दिसून येणार आहे. अर्थात पालकमंत्री राजेश टोपे याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागणार आहे.

Mahila Raj will come four Nagar Panchayats
अकोला : जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले ३९ गोवंशांना जीवदान

नगराध्यक्ष आरक्षण

मंठा सर्वसाधारण महिला

जाफराबाद सर्वसाधारण महिला

घनसावंगी सर्वसाधारण प्रवर्ग

बदनापूर सर्वसाधारण महिला

तीर्थपुरी सर्वसाधारण महिला

Mahila Raj will come four Nagar Panchayats
नाशिक : जप्त ११३ ट्रॅक्टरांचा जिल्हा बँकेतर्फे लिलाव

असे आहे पक्षीय बलाबल

नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप काँग्रेस अपक्ष

घनसावंगी १० ७ ० ० 0

तीर्थपुरी ११ ३ २ ० १

जाफराबाद ६ ० १ ६ ४

मंठा १ १२ २ २ ०

बदनापूर ५ ० ९ १ २

एकूण ३३ २२ १४ ९ ७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com