esakal | Rain Update: माजलगाव धरण ओहरफ्लो; ११ दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

majalgaon

महिनाभराची उसंत दिल्यानंतर पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे

Rain Update: माजलगाव धरण ओहरफ्लो; ११ दरवाजे उघडले

sakal_logo
By
पांडुरंग उगले

माजलगाव (बीड): बीड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणात मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक वाढली. रविवारी दिवसभरात पाण्याचा ओघ वाढत राहिल्याने रात्रीच धरण ९० टक्के भरले होते. रात्रीतून पाण्याची आवक आणखीनच वाढल्याने पहाटे ४ वाजता धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले. सुरवातीला अर्ध्या मीटरने उघडलेले दरवाजे सकाळी ९ वाजता २ मीटरने वर करण्यात आले असून ८७ हजार क्यूसेस प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात सोडले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. 

महिनाभराची उसंत दिल्यानंतर पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आमहिनाभराची उसंत दिल्यानंतर पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. शनिवारी (ता. चार) रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील छोटेमोठे धरण, तलाव, बंधारे भरून वाहू लागले आहेत. सिंदफणा नदीला सकाळी पुर आल्याने माजलगाव धरणात येणारी पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली होती. रविवारी (ता. पाच) सकाळीची धरणातील पाणीसाठा ७५ टक्यावर गेला होता. दिवसभरातही धरणात येणारा फ्लो सुरूच राहिल्याने सायंकाळपर्यंत पाणीसाठा ९० टक्केच्या जवळ गेला.

हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना टपालाने पाठविल्या गोवऱ्या

रात्री ८ वाजता दरवाजे उघडण्याची तयारी सुरू असतानाच धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग अत्यंत कमी झाला. मध्यरात्रीनंतर वण्याची आवक पुन्हा सुरू झाल्यानंतर पहाटे ४ वाजता माजलगाव धरणाचे ११ दरवाजे अर्ध्या सेंटीमीटर ने उघडण्यात आले. पाण्याची आवक वाढत राहिल्याने सोमवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता धरणाचे ११ दरवाजे २ मीटर. उचलण्यात आले असून जवळपास ७३ क्यूसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडले आहे यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

हेही वाचा: सायरा बानू यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी-

माजलगाव धरणाचे पाणी बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत असून धरणाच्या ब्याकवॉटरवर शेकडो एकर शेतीला या पाण्याचा फायदा होतोय. शेतीसह बीड, माजलगाव शहरासह परिसरातील ११ खेड्यांना धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते. यावर्षीही धरण १०० टक्के भरल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

loading image
go to top