कापसाच्या गाठींसह धावता ट्रक पेटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

माजलगाव - शहरालगतच असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदामातून कापसाच्या गाठीचे वजन करण्यासाठी जाणारा ट्रक विद्युत तारेला झालेल्या शॉर्टसर्किटने पेटला, तर यात ट्रकचा क्‍लिनर गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता. २७) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. 

शहरालगतच असलेल्या फुलेपिंपळगाव शिवारात वखार महामंडळाच्या गोदामातून मुंबई येथे एका सूतगिरणीसाठी कापसाच्या गाठी घेऊन जाणारा ट्रकने (एमएच- १६ एवाय ८५७७) पेट घेतल्याने गाडीचा क्‍लिनर पप्पू नकाडे जखमी झाला आहे. ट्रकचालक जालिंदर शंकर आंधळे (रा. केरूळ, ता. आष्टी) याने पेटता ट्रक दूर अंतरावर नेला. ट्रकसह कापसाच्या गाठीने पेट घेतला. येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे महेंद्र टाकणखार यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांसह आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत कापसाच्या गाठी जळून २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: majalgaon news Truck fire cotton

टॅग्स