

majalgaon telgaon Road accident beed bus hyundai car collision shindewadi phata khamgaon pandharpur highway 5 dead ymk86
Beed Bus and Hyundai Car Collision Kills : नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या माजलगावच्या भाविकांवर काळाने घाला घातला. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पात्रूडजवळील शिंदेवाडी फाट्यावर रविवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास बस आणि हुंदाई कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ वर्षीय बालकाचा समावेश असून, नामदास पिता-पुत्राचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेने माजलगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.