माजलगाव : साखर पोत्याचा ट्रक पलटी; पती - पत्नीसह दोन मुलांचा मृत्यू 

पांडुरंग उगले
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

माजलगाव (जि. बीड) : साखरेचे पोती घेऊन जानारा ट्रक पलटी झाल्याने त्याकखाली दबून दुचाकीवरील दाम्पत्य आणि त्यांची दोन लहान मुले असे चौघे ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. आठ) दुपारी परभणी फाटा जवळ घडली.

देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी गेलेल्या सोळंके कुटुंबावर पाडव्या दिवशी काळाने घाला घातला. 

दयानंद गणेश सोळंके (वय ४०), संगीता दयानंद सोळंके (वय ३६), राजनंदनी दयानंद सोळंके (वय सात), पृथ्वीराज दयानंद सोळंके (वय पाच) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

वरील कुटुंब गंगामसला येथील मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन त्यांच्या नातेवाईकांसह दोन मोटारसायकलवरून माजलगावकडे येत होते. त शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर एच.पी. गॅस गोदाम जवळ समोरून साखरेची पोते घेऊन येणारा ट्रक विरुद्ध दिशेने त्यांच्या गाडीजवळ येऊन पलटी झाला. या घटनेत दुचाकीवरील सोळंके दाम्पत्य ट्रक खाली डबल आणि त्यात दयानंद सोळंके,  संगीता सोळंके, पृथ्वीराज सोळंके यांचा जागीच मृत्यू झाला.

चालक दारूच्या नशेत वाहन  चालवीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दयानंद सोळंके हे जांबसमर्थ येथे एका खाजगी बँकेत नोकरीला होते. ते दिवाळीच्या सणानिमित्त गावाकडे आले होते.  पडव्यानिमित्त ते त्याच्या गावी श्री. मोरेश्वराचे दर्शन घेऊन परत।माजलगावला येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्दैवी घटनेने। परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Major accident near Majalgaon, four dead