Phulambri Politics : फुलंब्रीत उद्धवसेनेसह काँग्रेसला मोठा धक्का..! नगराध्यक्षांसह १३ जणांचा शिवसेनेत प्रवेश

फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला.
Phulambri 13 Leaders Including Municipal President Join Shiv Sena

Phulambri 13 Leaders Including Municipal President Join Shiv Sena

sakal

Updated on

फुलंब्री - फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्यासह तब्बल १३ जणांनी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐन वेळेवर दिल्लीला जावे लागल्याने खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार विलास भुमरे, जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे फुलंब्रीतील राजकीय समीकरणे बदलली असून, स्थानिक राजकारणात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com