esakal | उमरगा पालिकेच्या प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश | Umarga Municipal Council
sakal

बोलून बातमी शोधा

Umarga Municipal Council

उमरगा पालिकेच्या प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राज्यातील पालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारंभी एक वार्ड रचना तयार करण्याविषयीचे संकेत होते. मात्र सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या निर्णयात बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय झाला, त्यानुसार बुधवारी (ता.सहा) राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) अध्यादेश काढून प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान शहरात (Umarga Municipal Council) सध्या अकरा प्रभागात बावीस सदस्य संख्या आहे. कदाचित दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार कदाचित असेच चित्र असू शकेल. प्रारुप प्रभाग (Osmanabad) रचनेचा कच्चा आराखडा तयार करताना २०११ च्या जनगणनेनुसार नगर परिषदक्षेत्राची प्रगणक गटनिहाय एकुण लोकसंख्या, अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या व प्रगणक गटाचे नकाशे या बाबी विचारात घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा: तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात उत्साहात घटस्थापना

कच्चा आराखडा तयार करताना समितीची स्थापना, प्रगणक गटांची मांडणी करताना गुगल अर्थ अथवा तत्सम नकाशावर जनगणनेच्या प्रगणक गटाची मांडणी करण्यात यावी, मांडणी करताना नगर परिषदेचे कोणतेही क्षेत्र सुटणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभाग रचना करताना वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही. तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही. याची दक्षता घ्यावी आदी सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

राजकीय हस्तक्षेप टाळा !

रचना करताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अनेकदा चुका होतात. राजकीय दबावाला बळी पडून अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली जाते. अलीकडच्या काळात अनेक रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभाग रचनेबाबत आदेश दिलेले आहेत. यामुळे तयार केलेला कच्चा आराखडा कसा तयार करण्यात आला? का तयार करण्यात आला ? नियम व निकषांचे पालन झाले आहे का ? आदी बाबी आयोगाकडून तपासण्यात येणार आहेत. तपासणीत आढळून आलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण करणे व योग्य बदल करण्याची समितीची असेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

हेही वाचा: आघाडी सरकारला सुबुद्धी देवो,राधाकृष्ण विखेंची राज्य सरकारवर टीका

उमरगा पालिकेत होतील अकरा प्रभाग !

निवडणूक विभागाच्या सूचनेप्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होणार असुन तेव्हाची शहराची लोकसंख्या ३५ हजार ४७७ होती. हद्दवाढीमुळे वाढ होऊन ती ४१ हजार ८५९ आहे. दोन सदस्यीय रचनेत अकरा प्रभाग होतील. प्रत्येक प्रभाग हा साधारणतः तीन हजार आठशे ते चार हजार लोकसंख्याचा असेल. दरम्यान जानेवारी २०२१ च्या मतदार यादी प्रमाणे उमरगा शहराची मतदार संख्या २९ हजार १८७ आहे. त्यात पुरुष मतदार संख्या पंधरा हजार १०८ तर स्त्री मतदार संख्या चौदा हजार ७७ आहे. प्रभाग रचनेची प्रक्रिया गुरूवारपासुन सुरु झाली असून टप्प्याटप्प्याने याचे काम सुरू राहणार आहे.

loading image
go to top