बस- दुचाकीच्या अपघातात मामा भाचे ठार

फोटो
फोटो
Updated on

औंढा नागनाथ(जि.हिंगोली): बस व दुचाकीच्या अपघातात मामा, भाचे ठार झाल्याची घटना औंढा ते जिंतूर राज्य मार्गावरील टी पॉइंटवर गुरुवारी (ता.१९) दुपारी घडली. याप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया हट्टा पोलिस करत आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी की, प्रथमेश प्रकाश थिटे (वय २२) (रा.गोळेगाव) व त्‍यांचा मामा श्रीराम नागोराव शिखरे पाटील (रा.तोंडापूर ता. कळमनुरी) हे दोघेजण एमएच ३८ एल ८९५६ या दुचाकीवर औंढा नागनाथकडे येत होते. या वेळी त्यांची दुचाकी औंढा ते जिंतूर राज्य मार्गावरील टी पॉइंटवर आली. या चवेळी कळमनुरी आगाराची कळमनुरी-पुणे बस (एमएच २० बीएल २८५४) जात होती. या दोन्ही वाहनाची जिंतूर टी पॉइंट जवळ समोरासमोर धडक बसली. यात प्रथमेश थिटे हे जागीच ठार झाले; तर त्‍यांचा मामा श्रीराम पाटील हे गंभीर जखमी झाले.

उपचारासाठी नेताना मामाचा मृत्यू  

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी श्रीराम पाटील यांना उपचारासाठी औंढा येथील रुग्णालयात दाखल केले. या वेळी माजी उपसभापती अनिल देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, संतोष हाके, सुभाष कुटे, सुरेश चव्हाण, लखन पावडे, उद्धव नागरे, गंगाधर हाके, विलास पवार, दत्ता कपाटे, गजानन शिंदे यांनी देखील मदत केली. औंढा येथे जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आले. हिंगोली येथे उपचार करून त्‍यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना त्‍यांचा रस्‍त्‍यातच मृत्‍यू झाला. अपघातस्थळ हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हट्टा येथील पोलिस उपनिरीक्षक गजानन मोरे यांनी औंढा येथील दवाखान्यात भेट देवून माहिती घेतली. याप्रकरणी पंचानामा करण्याचे काम सुरू होते. 


कुरुंदा येथे विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू

कुरुंदा (जि. हिंगोली): वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे दुकानाचा फलक तयार करताना लोखंडी सीडीचा विद्युत तारेला स्‍पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्‍यू झाल्याची घटना बुधवारी (ता.१८) दुपारी तीनच्या सुमारास घडली.


या बाबत अधिक माहिती अशी की, येथून जाणाऱ्या वारंगा रस्‍त्‍यावर श्री. कन्नेवार यांच्या नवीन दुकानाचे काम सुरू आहे. या दुकानाचे नामफलक पेंटर शेख आयुब हे तयार करत होते. नामफलकाचे काम संपल्यावर शेख आयुब व दुकानाचा नोकर बालाजी वटमे हे दोघे लोखंडी सीडी बाजुला करीत होते. 

लोखंडी सीडीचा विद्युत तारेला स्पर्श

याच वेळी दुकाना समोर असलेल्या विजेच्या तारेला लोखंडी सिडीचा स्पर्श झाला. तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने दोघांनाही विजेचा धक्का बसला. दोघेही पाच फूट दूर फेकल्या गेल्याने शेख आयुब पेंटर व बालाजी वटमे हे दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्‍यांना तत्काळ नांदेड येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्‍यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केल्याची माहिती त्‍यांच्या कुटुंबीयांनी दिली. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद केली. दरम्‍यान आयुब पेंटर हे हस्तकलेत पारंगत होते. शेख आयुब पेंटर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर बालाजी वटमे या़ंच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com