गोदावरी नदीत पाय घसरुन सेवकाचा मृत्यू

पांडुरंग  कोरडे
पांडुरंग कोरडे

जातेगाव (जि.बीड) : प्रातःविधीस गोदावरी (Godavari River) काठी गेलेल्या सेवकाचा पाय घसरुन दुर्दैवी रित्या मृत्यू झाल्याची घटना रामपूरी येथे सोमवारी (ता.२०) सकाळी उघडकीस आली. पांडुरंग सखाराम कोरडे (वय ४९, रा.रामपुरी, ता.गेवराई) (Gavrai) असे त्या सेवकाचे नाव असून शनिवारी (ता. १८) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरातून प्रातःविधी करण्यास म्हणून गेलेले पांडुरंग कोरडे हे शनिवार रात्र आणि रविवारी घरी आले नसल्यामुळे कुटुंबीयानी त्यांचा रामपुरी शिवारात आणि नातेवाईक (Beed) यांच्याकडे शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. सोमवार (ता. २०) रोजी गोदावरी नदीच्या पात्रात पांडुरंग कोरडे यांचा महादेव मंदिराजवळ तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

पांडुरंग  कोरडे
खड्डा वाचविण्याच्या नादात दोन दुचाकींचा अपघात, दोघे ठार

पांडुरंग कोरडे हे जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळातील माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे सेवक म्हणून कार्यरत होते. तलवाडा पोलीसांना घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस जमादार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात पाठवून दिला. दरम्यान, कोरडे यांचा पाय घसरुन दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहीती पोलीसांना कुटुंबीयानी दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com