
Parbhani Accident : जिंतूरमध्ये दुचाकी-टेम्पोच्या अपघातात तरुण ठार
जिंतूर (जि.परभणी) : जिंतूर-येलदरी मार्गावर शहरापासून दोन किलोमीटरवर शुक्रवारी (ता.११) दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकी व टेम्पोची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात २६ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सचिन जानकीराम कऱ्हाळे असे मृताचे नाव आहे. तो तालुक्यातील (Jintur) पिंपळगाव-काळे येथील रहिवासी असल्याचे समजते. जिंतूर शहराला जोडणारे राज्य रस्ते, महामार्ग अरुंद असून सुस्थितीत नसल्याने मागील दोन-तीन महिन्यांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने दोन महिन्यात आठ जणांनी अपघातात आपला जीव गमावला. अनेक जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यातच आजच्या अपघाताची भर पडली. (Man Died In Accident In Jintur Taluka Of Parbhani)
हेही वाचा: अंबानी, अदानी यांची पूजा करा; भाजप खासदाराचा अजब सल्ला
पिंपळगाव (का) येथील २६ वर्षीय सचिन कऱ्हाळे हा युवक दुचाकी (एमएच-२२ एएक्स २८८६) वरून जिंतूरच्या दिशेने येत होता. त्याचवेळी समोरून येलदारीच्या दिशेने जात असलेल्या टेम्पोची शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील वीट भट्ट्यांजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक होऊन सचिन कऱ्हाळे याचा मृत्यू झाला. सदरील अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर क्षणात रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर जवळपास वीस मिनिटे मृतदेह जागेवरच पडून होता. अपघात होताच टेम्पो चलाक टेम्पोसह घटनास्थळावरून पसार झाला. ग्रामीण रुग्णालयात अपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते राम काजळे, नागेश आकात, रुग्णवाहिका राठोड यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणला. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत नोंदणीची प्रक्रिया सुरू (Parbhani) असल्याचे समजले.
Web Title: Man Died In Accident In Jintur Taluka Of Parbhani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..