नांदेडमध्ये नोटांसाठीच्या रांगेचा बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

दिगंबर कसबे (वय 60) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. आज सकाळी नऊ वाजता नांदेडजवळील शिडकू गावातील तुपा भागात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेत ही घटना घडली.

नांदेड - नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना नांदेडमध्ये घडली आहे. आज (बुधवार) सकाळी बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर कसबे (वय 60) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. आज सकाळी नऊ वाजता नांदेडजवळील शिडकू गावातील तुपा भागात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेत ही घटना घडली. कसबे हे बळीरामपूर येथील रहिवाशी आहेत. पहाटेच ते बँकेच्या रांगेत उभे राहिले होते. बँकेबाहेर रांगेत उभे असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. रांगेतील लोकांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने देशभरात बँकांबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे. मुंबईतही एका नागरिकाचा रांगेत उभा राहिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Web Title: man dies while waiting in line to get old currency notes in nanded