
घनसावंगीत मासेमारी करण्यास गेलेला एक जण बुडाला पाण्यात
घनसावंगी (जि.जालना) : देवीदहेगाव (ता.घनसावंगी) (Ghansawangi) येथील लघुसिंचन तलावात मासेमारी करणारा एक जण पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी (ता.१६) घडली. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.१७) त्याचा शोध लागला आहे. देवीदहेगाव लघुसिंचन तलावात मासेमारी करण्यासाठी सोमनाथ भिमराव ठाकरे (वय 45) हे शनिवारी (ता.१६) गेले असता पाण्यात बुडाले. स्थानिक (Jalna) नागरिकांनी शोध घेतला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर पंचायत समिती सदस्य अनिरूध्द शिंदे यांनी पोलिस व महसूल प्रशानास कळविल्यानंतर रविवारी (ता.१७) परतूर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.
हेही वाचा: मोदीराजमुळे सर्वांचा विकास, योगी आदित्यनाथ यांनी केला दावा
तर कर्मचारी मोटारबोटीच्याद्वारे शोध घेत आहे. तरी दुसरा दिवस चोवीस तासापेक्षा जास्त काळ लागला तरी शोध लागला नाही. शेवटी चार वाजता मृतदेह बाहेर काढण्यात कर्मचार्यांना यश आले. दरम्यान घटनास्थळी नायब तहसीलदार संदीप मोरे, पोलिस उपनिरीक्षक श्री.टाकसाळ, मंडळ अधिकारी श्रीपाद देशपांडे, तलाठी एस.एस. बुचडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
Web Title: Man Drowned Who Went For Fishing In Ghansawangi In Jalna
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..