पहिलीला सोडून दुसरीशी घरोबा; जावयाची धुलाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

औरंगाबाद, ता. 26 : पहिलीशी लग्न केले. दोन मुले झाली; पण सहा वर्षांनी तिला सोडून दुसरीसोबत घरोबा केला. समजावूनही उपयोग झाला नसल्याने जावयाला सासरच्या लोकांनी घरोबा केलेल्या महिलेच्या खोलीतून बाहेर काढत बेदम मारहाण करून डांबले. ही घटना मिसारवाडीत मंगळवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर घडली. पोलिसांनी गंभीर जखमी जावयाची सुटका केली. 
शोएब खान शेर खान (रा. मिसारवाडी) असे जावयाचे नाव आहे.

हर्सूल भागातील एका तरुणीशी रिक्षाचालक शोएब खान शेर खान याचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. एक वर्षापासून शोएबची दुसऱ्या एका विवाहित महिलेशी जवळीक वाढली. यानंतर ते एकत्र राहू लागले. मिसारवाडीतच एक खोली घेऊन ती महिला राहत होती. तेथेच शोएब खान याचा मुक्काम वाढू लागल्याने पत्नी अस्वस्थ झाली. माहेरी जाऊन तिने शोएब खानबाबत तिच्या भावांना सांगितले. यानंतर तिच्या भावांनी शोएब खानचा माग काढला. त्यांनी त्याची फोनवरून समजूतही काढली.

परंतु, शोएबने त्यांचे काहीही ऐकले नाही. त्याला फोनवरून मेहुण्यांच्या धमक्‍या येत असल्याने त्याने मिसरवाडीतील खोली बदलून दुसरी खोली भाड्याने घेतली. तरीही त्याला त्यांनी हुडकून काढले. यानंतर बुधवारी रात्री त्यांनी शोएबची खोली गाठली. खोलीत राहणाऱ्या महिलेसमक्ष त्याला बाहेर काढून बेदम मारहाण केली. दरम्यान, शोएबला घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून त्याच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. 

खोलीत डांबले 
शोएबला दांड्यासह दगडाने मारहाण झाली. यात हातापायांसह डोक्‍याला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्याला बांधून हर्सूलमध्ये एका वाहनाद्वारे नेण्यात आले. तेथे त्याला खोलीत डांबले. या घटनेनंतर सिडको पोलिसांनी रात्री माहिती घेत त्याची सुटका केली. 

Web Title: man gets beaten for cheating on wife