Jalna Crime : शेती नावावर करत नसल्याचा राग, पोटच्या मुलाने कुऱ्हाडीने घाव घालत बापाला संपवलं

मुलगा विलास हा सकाळी सुध्दा दारुच्या नशेतच होता त्याला बापाला मारुन टाकल्याचा थोडाफार सुध्दा पश्चताप त्याच्या चेहर्‍यावर दिसुन येत नव्हता
Crime News
Crime Newsesakal

पारध : वडीलाच्या नावावर असलेली शेती आपल्या नावावर करून देण्याच्या कारणावरून दारुड्या मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याच्या डोक्यात कुराड मारून खून केल्याची घटना रविवारी (ता. सात) जळगाव सपकाळ ता. भोकरदन येथे उघडकीस आली. पारध पोलिसांनी याप्रकरणी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, जळगाव सपकाळ येथील मयत सुभाष सखाराम पालोदे हे आपल्या कुटुंबासह गावापासुन दोन किलोमिटर अंतरावर शेतात राहत होते. मात्र शनिवारी (ता. सहा ) रात्री बाप व लेकामध्ये घराजवळील गोठयात शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून वाद झाला. यानंतर मुलगा विलास सुभाष पालोदे (वय 44) यांने वडील सुभाष सखाराम पालोदे (वय 60) यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन त ठार मारले असल्याची घटना रविवारी (ता. सहा) सकाळी उघडकीस आली. याची माहीती गावभर पसरली त्यानंतर सदर घटनेची माहिती पोलीसांना कळताच पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग घुसंगे, प्रदिप टेकाळे, ओम नागरे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेतल्यानंतर आरोपी विलास पालोदे याला ताब्यात घेण्यात आले. मयत सुभाष सखाराम पालोदे यांचा मृतदेहावर जळगाव सपकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून दुपारी साडेतीन वाजता पोलिस बंदोबस्ततात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Crime News
Worli Hit And Run Case: वरळीत 'हिट अँड रन'प्रकरणातील आरोपीने बारमध्ये पिलं इतक्या हजारांचं मद्य, बिलाचा फोटो व्हायरल

मुलगा विलास हा सकाळी सुध्दा दारुच्या नशेतच होता त्याला बापाला मारुन टाकल्याचा थोडाफार सुध्दा पश्चताप त्याच्या चेहर्‍यावर दिसुन येत नव्हता. संबधीत आरोपी विलास पालोदे यांने नातेवाईक व भाऊबंद यांना फोन करुन बाप मृत झाल्याची माहिती कळविली. तसेच पावसाचे दिवस असल्याने लवकर अंत्यसंस्कार करा असे सांगितले माञ सदरील घटनेच्या ठिकाणी नातेवाईक गेले असता सदरील घटना वेगळीच झाल्याची शंका आली असल्याने पोलीसांना बोलविण्यात आले. संबधीत घटनेची पारध पोलीसांनी चौकशी केली असता मयताचे कपडे राहत असलेल्या घराजवळील शेतात पुरुन टाकल्याचे आढळून आले.

Crime News
Mumbai Accident : मुंबईत पुन्हा हिट अँड रन! मच्छी आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला उडवले

पोलीस बंदोबस्तात अंंत्यसंस्कार

मयत सुभाष पालोदे यांच्यावर रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मयताची मुलगी लता पालोदे हिने बापाला अग्नीडांग दिला. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात मयताची पत्नी लक्ष्मी सुभाष पालोदे यांच्या फिर्यादी वरून मुलगा विलास पालोदे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com