esakal | पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीनच्या राशी थांबल्या,शेतकरी अडचणीत | Osmanabad Rain
sakal

बोलून बातमी शोधा

मळगीवाडी (जि.उस्मानाबाद) : गेल्या आठवड्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या सोयाबीनचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीनच्या राशी थांबल्या,शेतकरी अडचणीत

sakal_logo
By
अविनाश काळे

नाईचाकूर (ता. उमरगा) : सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने कौटुंबिक विरह असतानाही सोयाबिन जमा करणारा चेतन पवार .... सोबत व्ही.डी.ओ .

-----

-----

-----,

उमरगा (जि.उस्मानाबाद) : सततच्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीनच्या राशी थांबल्या आहेत, तर अनेकांच्या शेतातील सोयाबीन क्षेत्रात पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे आभाळ कोसळत आहे. दरम्यान नाईचाकूर येथील चेतन राम पवार यांच्या दीड एकर क्षेत्रातील अंतरपिक असलेले सोयाबीन पूर्णतः पाण्यात गेले आहे. उमरगा तालुक्यात गेल्या चार, पाच दिवसापासुन पावसाची संततधार सुरू आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात अडकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी काढणी करून गंजी केल्या आहेत. मात्र पावसामुळे राशी शक्य होत नाहीत.

चेतनच्या नशिबी दुहेरी दुःख !

नाईचाकूर येथील शेतकरी चेतन राम पवार यांची पत्नीचे सहा महिन्यापूर्वी प्रसुतीनंतर काविळीच्या आजाराने निधन झाले. जन्मलेल्या बाळाचा सांभाळ आजी करत आहेत. त्यात महिनाभरापूर्वी गाईने जुळ्या वासरांना जन्म घातला. मात्र शेतात झाडाला बांधलेल्या दोरखंडाचा गाईच्या गळाला फास आवळला. त्यात गाय दगावली. आता नैसर्गिक संकटाचे दुःख चेतनच्या नशीबी आले आहे. शेतातील सोयाबीनमध्ये पाणी साचल्याने चेतन पावसातच जमेल तेवढे सोयाबीन काढून बाजेवर जमा करत आहेत.

loading image
go to top