पुरुष नसबंदीला ‘नको रे बाबा’

Man-Sterilization
Man-Sterilization

बीड - नसबंदीची शस्त्रक्रिया नको रे बाबा म्हणत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेपेक्षा ही शस्त्रक्रिया सोपी आहे. या वर्षात जिल्ह्यात कुटुंब नियोजनात पुरुष नसबंदीच्या १२०० शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून या नऊ महिन्यांत केवळ २५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शस्त्रक्रियेची ही टक्केवारी तीनपेक्षाही कमी (२.०८ टक्के) आहे. तर, महिलांच्या शस्त्रक्रियांची टक्केवारी ७० च्या जवळपास असून मागील नऊ महिन्यांत १० हजार २११ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

आरोग्य विभागाला २०१८-१९ या वर्षासाठी महिलांच्या १४ हजार ७३० कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया तर पुरुषांच्या नसबंदीच्या १२०० शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, नोव्हेंबरअखेरपर्यंत महिलांच्या दहा हजार २११ शस्त्रक्रिया करण्यात झाल्या. पण, पुरुषांची आकडेवारी २५ आहे.

महिलांपेक्षा सोपी तरीही...
महिलांची एक टाक्‍याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची झाली तरी तीन दिवस दवाखान्यात घालवावे लागतात. पुरुष नसबंदी दोन तासांत उरकते. तरीही पुरुषांची या शस्त्रक्रियेसाठी ‘नको रे बाबा’चीच भूमिका असल्याचे दिसते.

जनजागृतीचाही अभाव
पुरुष नसबंदीबाबत समाजमनात अनेक गैरसमज आहेत. मात्र, शिक्षित पुरुषही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. किमान उच्चशिक्षितांसोबत वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्यात तरी जनजागृती करून या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घ्यायला लावायला आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

कुटुंब नियोजनात गडचिरोलीचे पुरुष आघाडीवर
महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदुरबार, भंडारदरा या ठिकाणी पुरुष कुटुंब कल्याण नियोजनात मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करत आहेत. सध्या महिलांचे जे प्रमाण बीडमध्ये आहे, ते प्रमाण गडचिरोलीमध्ये पुरुषांचे आहे. तेथील पुरुष महिलांना शस्त्रक्रियांसाठी पुढे न करता स्वत: या शस्त्रक्रिया करून घेत आहेत.

महिलांच्या शस्त्रक्रियांची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका          उद्दिष्ट       साध्य

बीड               ३३७४       २१५४
अंबाजोगाई      १७८९      १७२१
केज               ११५६       १०७८
माजलगाव      १४४८        ९२९
आष्टी            १०७४        ८३३
गेवराई           १७७८        ७९०
परळी             १९६९        ६७३
पाटोदा             ५०९        ४५७
वडवणी            ३६१        ३९७
धारूर              ७५९        ३२२

उद्दिष्टाच्या तीन टक्केही शस्त्रक्रिया नाहीत
महिलांना पुढे करण्याची प्रथा कायम
वर्षभरात दहा हजार महिलांची शस्त्रक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com