परळीत तरुणाचा चाकुने वार करुन खून

प्रविण फुटके
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

परळी वैजनाथ : येथील बरकतनगर भागातील शेजारी राहणारा युवकाचा बाचाबाचीतून चाकुने सपासप वार करुन निघृणपणे खुन केल्याची घटना सोमवारी (ता. तीन) रात्री उशिरा खुन करण्यात आला. शेख मकदुम शेख कलंदर (वय 28) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : बरकतनगर भागातील शेख मकदुम शेख कलंदर हा व आरोपी शेख समीर शेख वल्ली हे दोघे सोमवारी रात्री ढाब्यावर जेवणासाठी गेले. जेवण करुन परत येत असताना शेख समीर शेख वल्ली याने रस्त्यात दुचाकी थांबविली. ’तु माझ्या घरात दखल का देतोसट असे म्हणत भांडणाला सुरुवात केली. यानंतर शेख समिर शेख वल्ली याने मकदुम शेख कलंदर याच्यावर चाकुने सपासप वार केले. यात तो जागेवरच ठार झाला. या प्रकरणी शेख मुस्तफा शेख कलंदर याच्या फिर्यादीवरुन शेख समीर शेख वल्ली याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: man s murder in parali

टॅग्स