बायकोला म्हणाला आलो पलिकडे गाडी लावून अन् गेला पुरात वाहून

A man was carried away with flood in nanded in front of wife and children
A man was carried away with flood in nanded in front of wife and children

मुखेड : अतिऊत्साह एका तरूणाच्या जीवावर बेतलाय. नांदेडमधील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे पत्नी, मुलासह दुचाकीवर सासुरवाडीला जाणारा हणमंत बडगणे हा तरुण लेंडी नदीला पूर आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना काल सायंकाळी घडली.

वाहून गेलेली दुचाकी सापडली मात्र, बडगणे याचा अद्याप शोध लागला नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध सुरू असून, हाणमंत बडवणे हा रावी येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथे सासुरवाडी असल्याने पत्नी, दोन मुलांना घेऊन जात होता. लेंडी नदीला पूर आल्याने छोट्या पुलावरुन पाणी वाहत होते.

यावेळी हाणमंत बडगणे हा कुटुंबासह पाण्यातून जाण्याच्या प्रयत्नात होता त्यावेळी नागरिकांनी 'तु वापस जा'  सांगून पाणी कमी झाल्यानंतर गावाकडे जा असे सांगितले मात्र, बडवणे यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. पत्नी आणि मुलांना दुचाकीवरुन उतरवले आणि दुचाकी नदीच्या पलीकडे लावून येतो असे सांगून पाण्यातून दुचाकी घेऊन गेला त्याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढला आणि बडवणे दुचाकीसह वाहून गेला. बडवणे काल पासून बेपत्ता असून, पती डोळ्या समोर वाहून गेल्याने पत्नीला मोठा धक्का बसला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com