किनवट तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

मांडवी - सततची नापिकी व कर्जाबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मांडवी - सततची नापिकी व कर्जाबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना किनवट तालुक्‍यातील लिंगी येथे घडली. लिंगी येथील शेतकरी पोचारेड्डी पोचन्ना निम्मावार (वय 60) यांचा शेती उनकेश्‍वर शिवारत आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून सतत नापिकी होत होती. यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. कर्जाची परतफेड व कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे त्यांना शक्‍य होत नव्हते. मंगळवारी रात्री गव्हाला पाणी देण्यासाठी म्हणून ते शेतावर गेले. तिथेच त्यांनी फवारणीला आणलेले विषप्राशन केल्याने त्यांचा शेतातच मृत्यू झाला. बुधवारी (ता. 20) सकाळी नातेवाईक शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: mandavi nanded news farmer suicide