Ashok Chavan : चव्हाणांच्या पक्षांतरावर ठाकरे स्पष्टचं बोलले; म्हणाले, दोन वेळा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manikrao Thackeray & Ashok Chavan

Ashok Chavan : चव्हाणांच्या पक्षांतरावर ठाकरे स्पष्टचं बोलले; म्हणाले, दोन वेळा...

Manikrao Thackeray On Ashok Chavan : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यानंतर फडणवीस आणि चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण देत एका ठिकाणी गणपती दर्शनासाठी गेलो असता तेथे आमची भेट झाल्याचे सांगत भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर आता चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनीदेखील भाष्य केले आहे. ते हिंगोलीत बोलत होते.

हेही वाचा: Vishwajeet Kadam : काठावरच्या विश्वजीत कदमांना थोरांताचा सल्ला; म्हणाले...

ठाकरे म्हणाले की, अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे ते पक्षा सोडण्याचा विचार करूच शकत नाही. चव्हाणांच्या पक्षांतराच्या बातम्या विरोधी पक्षांकडून पसरवल्या जात असून, यामागे चव्हाणांचा अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Maharashtra Political Crises : सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटालाचं प्रश्न Who Are You?

नुकत्याच दिल्लीतील एका सभेत माझी आणि चव्हाणांची भेट झाली. या सभेत काँग्रेसच्या केवळ 10 जणांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यातील एक अशोक चव्हाण होते. अशोक चव्हाण दोन वेळा मुख्यमंत्री होते. प्रांताध्यक्ष होते. त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडीचे नेते असलेले अशोक चव्हाण असा पक्षांतराचा विचार करूच शकत नाही असा दावा ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

Web Title: Manikrao Thackeray On Ashok Chavan Bjp Party Joining

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..