इस्रो गगनयानमध्ये ‘मनोज’ ची भरारी

MANOJ BHAVR.
MANOJ BHAVR.

नांदेड : घरची आर्थिक परिस्थिती नाजुक असताना दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पुर्ण केल्यावर पुढील शिक्षणाचा यक्ष प्रश्न डाेळ्यासमाेर उभा हाेता. यातच शिक्षकाने केलेले मार्गदर्शन आणि त्यातुन मिळालेली उर्जा व त्याला कष्टाचे बळ देत शिक्षणासाठी अर्धवेळ नाेकरी करून अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केले. यानंतर स्वप्नाला पुर्ण करण्यासाठी मन लावून ‘इस्त्रो’साठीच्या परीक्षेची तयारी करत मनाेज भवरने गगनभरारी घेतली आहे.

 
   घरची आर्थिक परिस्थिती नाजुक, मात्र मुलगा शिक्षणात हुशार, काय करावे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे अाणावे तरी कुठुन हा एका हुशार मुलाच्या वडीलांसमोरील सर्वात मोठा प्रश्न होता. मुलगा मालेगावच्या जिल्हा परिषद शाळेत हलाखीच्या परिस्थितीची जान ठेवत रात्रंदिवस मन लावून अभ्यास करत होता आणि शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत असे. गावात बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र या हुशार मुलाने नांदेडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. त्याचे नाव मनोज भवर. मनोजचे वडील शहरातील कापड दुकानावर मजुर आहेत. मनोजला तीन भाऊ आहेत आणि आई गृहिणी आहे.

त्यामुळे सर्व भावांचे शिक्षण पूर्ण होत नव्हते. त्यांना वेळेवर पैसे पोहचत नव्हते. त्याने नांदेडच्या आयटीआय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर देखिल गरिबी पाठ सोडत नव्हती. शिक्षण घेताना अनेक वेळा मनोजला दोन वेळच्या जेवणासाठी झगडावे लागत होते. परंतु, त्याने शिक्षणापासून कधीच दूर जाण्याचा विचार केला नाही. परिस्थितीशी दोन हात करत शिक्षणावरचे लक्ष विचलित होऊ दिले नाही. पोटाला चिमटा देत शिक्षण घेत असताना परिस्थिती खुप काही शिवकून जात होती.

आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोजने बाहेर काम करून औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयात प्रवेश मिळवला आणि शिक्षणासोबतच पोटाची सोय व्हावी म्हणून त्याने खासगी शिकवणी वर्गावर दोन तास पार्टटाईम नाेकरी शाेधली. अशा पद्धतीने त्याने प्रथम श्रेणीत तंत्रनिकेतनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मनासारखे शिक्षण नसले झाले तरी, घरच्या परिस्थितीमुळे ‘बस झाले शिक्षण’ आता नाेकरी करावी असा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याने तसा निर्णय देखिल घेतला. परंतु, मनोजची हुशारी बघुन एका शिक्षकाने त्याला अभियांत्रिकी करण्याचा सल्ला दिला.

मनोजने देखिल शिक्षकांचा सल्ला एेकत पुन्हा नांदेडच्या गुरू गोविंदसिंघ अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घेतला शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याने तीन वर्ष पुन्हा एका खासगी शिकवणी वर्गावर नाेकरी सुरू केली आणि २०१७ साली शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर एक वर्षभर त्याने इस्त्रोचा अभ्यासक्रम मन लावून करण्याचे ठरविले. दरम्यान त्यांने इस्त्रोसाठीच्या तिन्ही परिक्षेत चांगले यश मिळवले आणि त्यांच्या कष्टाचे सोने झाले. मागील महिण्यात त्याचे ‘इस्रो’च्या गगनयान प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. ही गोष्ट नांदेडसाठीच नव्हे तर जे कष्टातुन शिक्षण घेतात, त्यांच्यासाठी प्रेरणादायी अशीच आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com