
Laxman Hake on Manoj Jarange Patil: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आता राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. जरांगेंचं वजन ३५ किलो अन् म्हणतोय घरात घुसून मारीन, अशा शब्दांत त्यांनी हिणवलं आहे. जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून केलेल्या विधानावर हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छ्त्रपती संभाजीनगर इथं ते बोलत होते.