
मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर पाच दिवसांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य करुन घेतल्या. यानंतर ते छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांनी रुग्णालयात आज पत्रकार परिषद घेत सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणारच हे ठणकावून सांगितले.