

Manoj Jarange reiterates his stand on the Maratha reservation movement and announces the planned protest in Mumbai
esakal
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केला आहे. सरकारकडून कितीही नोटिसा काढल्या, चौकशा केल्या किंवा आंदोलनाला साथ देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली, तरी आंदोलन थांबणार नसल्याचे त्यांनी म्हटले. “मुंबईत जाऊन मरेन, पण फुटणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत त्यांनी मंत्री आणि सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. माझी भाषा शिवराळ नसून सरकारचा नाकर्तेपणा आणि मराठ्यांवरील अन्याय याविरोधातील संताप असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.