

Manoj Jarange Patil addresses supporters amid the Maratha reservation agitation at Antarwali Sarati, with heightened police deployment in Jalna
esakal
Maratha Reservation: आजपासून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली असून, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी विविध पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर जालना पोलिस प्रशासनानेही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी तयारी केली आहे.