मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Manoj Jarange Patil मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली असून त्याचा मार्ग कसा असेल हेसुद्धा सांगितलं. आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Esakal

Updated on

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं मुंबईला जाणारच यावर मनोज जरांगे पाटील ठाम झाले आहेत. त्यासाठी अंतरवाली सराटी इथं आज मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग, दिवस आणि नियोजन याची माहिती दिली. मुंबईतील आंदोलन कसं असेल, कुठून जायचं याचं सविस्तर नियोजन जरांगे पाटील यांनी सांगितलं. आपण सर्वांनी एकाच मार्गाने एकजुटीने मुंबईला जायचं असल्याचं जरांगे म्हणाले. शांततेत आंदोलन करायचं असल्याचंही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com