Manoj Jarange Patil :...नाही तर टांगा पलटी केल्या शिवाय राहणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा 

Manoj Jarange Patil Latest News : जातीसाठी जेलमध्ये सडायला तयार आहे. माञ सग्या सोयर्‍याची अंमलबजावणी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असंही जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal

उदगीर : लोकसभा निवडणुकीमध्ये कोणालाही पाठिंबा नाही. महाराष्ट्रात एकही अपक्ष उमेदवार देखील उभा करणार नाही, ज्यांना ज्या उमेदवाराला पाडायचं त्यांनी त्या उमेदवाराला पाडावं. महाराष्ट्रातील ९२ ते ९३ मतदार संघात मराठ्यांची ताकद आहे. ती कळली पाहीजे. राजकारणात आम्हाला हलक्यात घेवु नका. टांगा पलटी केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. बुधवारी (ता. १०) रघुकुल मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतिने मराठा समाज सवांद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की , देशातल पहिल आंदोलन असेल जे की अचारसंहितेच्या काळात सुद्धा चालु आहे. कोणालाही विरोध करायच म्हणून आंदोलन केल नाही. मागासवर्यीग आयोगाने समाज मागासवर्गीय ठरवला असल्यास ओ.बी.सी प्रवर्गातून आरक्षण द्यायला पाहीजे होते. दहा टक्के आरक्षण देवुन निवडणुका मारुण न्यायच्या होत्या. यापुर्वी त्यांनी हेच केले.

१० टक्काचे आरक्षण टिकणार नाही. म्हणुन आम्ही विरोध केला. तर माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं. तेव्हा माञ मी त्यांना सोडल नाही. माझी चौकाशी लावली गेली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आडून हल्ला केला. अंतरवली सराटी येथील आंदोलनाचा मंडप काढण्याचा प्रयत्न केला. विविध गुन्हे दाखल करुण त्यांना राज्यातून तडीपार करायच होत. तडीपार केलम तर दुसर्‍या राज्यात मराठ्यांना घेवून आंदोलन करेन.

जातीसाठी जेलमध्ये सडायला तयार आहे. माञ सग्या सोयर्‍याची अंमलबजावणी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आरक्षण नाही दिल्यास विधानसभा गेली म्हणून समजा... मला पद आणी पैसे नको. मराठ्यांच्या लेकराबाळासाठी माझा लढा आहे. सहा जून पर्यत आरक्षण द्या अन्यथा सहा करोड मराठ्यांची सभा नारायण गडावर होणार आहे. याचा प्रचार जोरदार करा. असे अव्हान समाज बांधवांना केले. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com