Jalna News : राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे

मनोज जरांगे यांचे आवाहन : मराठा आरक्षणाबाबत २४ डिसेंबरपर्यंत वाट पाहू
nanded
nandedsakal

बदनापूर : सरकारने आम्हाला कागदावर लिहून दिलेले आश्वासन पूर्ण करावे. आम्ही आता फक्त २४ डिसेंबरपर्यंत विनंती करू शकतो, त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी (ता. २१) रात्री बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पसच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना दिला.

दरम्यान, या सभेपूर्वी जरांगे यांची भव्य रॅली काढण्यात आली. त्यात त्यांचा जागोजागी सत्कार करण्यात आला. रॅली आणि जाहीर सभेला सकल मराठा समाजाचा उदंड प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि जिजाऊ वंदनेने जाहीर सभेची सुरवात करण्यात आली.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले, आरक्षणाच्या लढाईने मराठा समाज एकत्र आला आहे. आज आपण सभा ठेवली आणि नेमके आज सरकारचे शिष्टमंडळ भेटीला आले. अर्थात यापूर्वी देखील दोनदा शिष्टमंडळ येऊन गेले. या बैठकीच्या माध्यमातून नेमका सरकारचा मानस काय? मराठा समाजाला आरक्षण नेमक्या कोणत्या पद्धतीने द्यायचे? हे स्पष्ट होणे गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या पटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला. विशेष म्हणजे तिन्ही कायदे मंडळ देखील सक्रिय होते. जर तुम्हाला एखादा कायदा पारित करायचा असेल तर पुढे अधिवेशन बोलवायची आवश्यकता नाही.

तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल आणि जर २४ डिसेंबरपर्यंत अधिवेशन संपत असेल तर अधिवेशनाची मुदत वाढवा. उगाच विशेष अधिवेशन घेण्याचा घाट घालू नका. कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. दोन अहवाल दिले, त्यापैकी एक अहवाल स्वीकारला असता ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या. दुसरा अहवाल देखील सरकारने स्वीकारला आहे.

तर मग मराठ्यांना आरक्षण देण्यात अडचण काय? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. तुम्ही एक महिन्याचा वेळ मागितला आम्ही ४० दिवसांचा वेळ दिला. तर तुम्ही म्हणता, यावेळी तुम्हाला ऐकावे लागेल. आणखी वेळ मिळाला तर आणखी मराठ्यांच्या नोंदी घेता येतील आणि कायदा पारित करता येईल. यानंतर मराठ्यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला.

थेट २४ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, यात आमची चूक काय? सरकारच्या शिष्टमंडळाच्या आज बैठकीत मागच्या वेळी जेवढे आले होते त्यापेक्षा निम्मेच हजर होते. यापूर्वी उपोषण सोडण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आले. त्यात राज्य सरकारचे मंत्री, अभ्यासक, कायदे मंडळाचे सदस्य, मंत्रालयातील सचिव असा लवाजमा होता. मराठा आरक्षणाचा निर्णय दिलेल्या मुदतीत घेतला नाही तर पुढच्या २३ तारखेला पुढील दिशा मराठा समाज ठरवेल. तुम्हीच जे लिहून दिले ते खरे करून दाखवा, यापेक्षा आम्ही अधिक मागत नाही. मी फक्त २४ डिसेंबरपर्यंत विनंती करणार त्यानंतर नाही, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितले.

आमच्या हक्काचे ओबीसी आरक्षण द्या

आम्ही मुंबईला जाणार असे कुठे बोललो. तुम्ही आम्हाला नोटिसा देऊन वातावरण दूषित करू नका. मराठा समाज संघर्ष करणारा समाज आहे, हे लक्षात ठेवा. आमच्या नोंदी सापडल्या. आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसी आरक्षण द्या, आम्ही कुणाचे खात नाही, असेही जरांगे म्हणाले. दरम्यान, जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार नारायण कुचे यांच्यावर नाव न घेता टीका केली. सभेपूर्वी जरांगे यांचे ७५ जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तर विविध पक्ष संघटनांनी त्यांचा जागोजागी सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com