मंठा बाजार पेठ शंभर टक्के बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मंठा : भारतीय संविधान जाळणाऱ्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याचे भारतायत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी मंठा येथे संविधान बचाव समितीच्यावतीने मंठा बंदच्या हाकेला प्रतिसाद देऊन शनिवारी (ता.18) मंठा बाजार पेठ शंभर टक्के बंद ठेवण्यात आली आहे. 

मंठा तालुका संविधान बचाव समितीच्या वतीने शनिवारी (ता. 18) बंद पुकारला होता. दिल्ली येथे संविधान जाळणाऱ्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्याचे भारतायत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी मंठा येथे समितीच्यावतीने सकाळी मुख्य फेरी काढून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवाजी चौकात माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सर्व पक्षीय श्रद्धांजली वाहिली. 

यावेळी संविधान बचाव समितीचे अॅड. मधुकर मोरे, प्रकाश घुले, नगराध्यक्ष नितीन राठोड, उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, नगरसेवक अरुण वाघमारे, प्रदीप बोराडे तसेच अॅड. राजेश खरात, भाऊसाहेब खंदारे, राजेश खंदारे, कय्युम कुरेशी, अली कुरेशी, नितीन मोरे आदीसह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. 
 
Web Title: The mantha market is one hundred percent closed