Forest Department: कोल्हावाडी शिवारात बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचे पायांचे ठसे आढळल्यानंतर वन विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मानवत : तालुक्यातील कोल्हावाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.