

Manwat Drug Case Police Arrest Six More As MD Drug Racket Investigation Expands Across Latur Parli And Kalamb
esakal
-सत्यशील धबडगे
मानवत(परभणी) : मानवत शहरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईला आता मोठे यश मिळाले आहे. २६ जुलै रोजी ७३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्या कसून चौकशीतून या प्रकरणातील आणखी सहा आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे.