

Manwat Parbhani Highway Bridge
esakal
मानवत : मानवत-परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील खरवडे-किन्होळा पाटी परिसरातील पुलाच्या दुरवस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाखालली भागात काँक्रीट मोठ्या प्रमाणात निखळून पडले असून, आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पुलावरून रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. एसटी बस, ट्रक, जड वाहने, चारचाकी, दुचाकींची सतत वर्दळ असताना पुलाची अवस्था धोकादाय बनल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलाच्या संरचनेची तातडीने तज्ज्ञांकडून तपासणी न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
पुलाच्या खालच्या भागात अनेक ठिकाणी काँक्रीट निखळल्याचे छायाचित्रातून स्पष्ट दिसत आहे. लोखंडी सळ्या उघड्या पडल्याने पुलाची झीज झाल्याचे दिसत आहे मात्र या गंभीर बाबीबाबत संबंधित विभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही असा सवाल नागरिकांनी केला आहे.
दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा दुर्घटनेपूर्वीच तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने तत्काळ या धोकादायक पुलाची पाहणी करून संरचनात्मक तपासणी करावी, पुलाची दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी तोपर्यंत वेग कमी करून सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.
पुलाची अवस्था धोकादायक असून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? काँक्रीट निखळून लोखंडी सळ्या उघड्या पडलेल्या असताना पुलाची तातडीने तपासणी का होत नाही. मोठ्या दुर्घटनेनंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा आजच पुलाची सुरक्षितता तपासणे गरजेचे आहे.
पुलाची तज्ज्ञांकडून संरचनात्मक तपासणी करावी, धोकादायक भागाची तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण करावे, हा पुल कमकुवत असल्याचा व सुरक्षिततेबाबत स्पष्ट सूचना फलक लावावेत, आवश्यक असल्यास वाहतुकीवर वेगमर्यादा व नियंत्रणाचे उपाय करावेत. संबंधित विभागाने पाहणीचा अहवाल सार्वजनिक करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.