क्रांतीदिनीच्या आंदोलनाचा आज औरंगाबादेत फैसला 

अतुल पाटील
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

बैठकीनंतर होणार घोषणा 
राज्यव्यापी समन्वयकांच्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता बैठकीला सुरवात होणार आहे. राज्य समन्वय समितीशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. 

औरंगाबाद : मराठा आरक्षणप्रश्‍नी मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्य समन्वयकांची तातडीची बैठक बुधवारी (ता. 8) औरंगाबादेत होणार असून क्रांती दिनी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाचा फैसला याच बैठकीत होईल. क्रांती चौकातील आंदोलनस्थळी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले, मात्र सरकारनेही त्याप्रकारचा "टाईमबॉंड' देण्याची भूमिका समन्वयकांनी स्पष्ट केली. 

परळी आणि नवी मुंबईत होणारी आंदोलने मागे घेण्यात आली, तरी मराठा क्रांती मोर्चाचे केंद्र ठरलेल्या औरंगाबादेतील समन्वयक ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत. मराठा आरक्षणासाठी 18 जुलै रोजी परळीत ठिय्या आंदोलनाची सुरूवात झाली, मात्र राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला. आरक्षणासाठी वीसपेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. न्यायालयाने राज्य मागास आयोगाच्या अहवालासाठी कालावधी ठरवून दिला आहे. मात्र, अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन आठ दिवसात बोलवावे. अशी मागणी करत औरंगाबादेतील समन्वयक आक्रमक झाले आहेत. 

बैठकीनंतर होणार घोषणा 
राज्यव्यापी समन्वयकांच्या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता बैठकीला सुरवात होणार आहे. राज्य समन्वय समितीशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. 

Web Title: Maratha Kranti Morcha agitation