लातूर - औशात मराठा आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

जलील पठाण
मंगळवार, 31 जुलै 2018

औसा (लातूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी टाका (ता. औसा) येथील मराठा समाजाच्या आठ तरुणांनी गुरुवारी (ता. 8) 30 तारखेपर्यंत आरक्षण नाही दिले तर 31 तारखेला येथील तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या नुसार मंगळवारी (ता.31) या आठ तरुणांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ या तरुणांना ताब्यात घेतले.

मराठा आरक्षणाची धग दिवसेंदिवस वाढतच चालली असून औसा तालुक्यातील टाका येथील आठ तरुणांनी ३० तारखेपर्यंत अरक्षणा बाबत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर मंगळवारी तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. शासनाकडून आरक्षणाबाबत कांहीच ठोस निर्णय न झाल्याने मंगलवारी (ता.३१) रोजी तरुणांचा जमाव घोषणा देत तहसील कार्यालयात दाखल झाला. सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गनिमी काव्याने झाला प्रयत्न
घोषणा देणारे तरुण वेगळेच होते परंतु पोलिस निवेदन दिलेल्या तरुणांना शोधत असताना हे तरुण तहसील कार्यालयाच्या बाजूस दबा धरून बसले होते. बाकी तरुणांचा जमाव तहसीलच्या समोर येताच दबा धरून बसलेले तरुण घोषणा देत बाहेर आले त्यांच्या हातात रॉकेलच्या बाटल्या होत्या त्या त्यांनी स्वतःवर ओतून घेतल्या आणि खिशातील अगपेटी काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी या तरुणांना दबोचून बाजूला सारले. त्यानंतर त्यांची समजूत घालन्यात अली. नंतर या आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडला. उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आणि तहसीलदारअहिल्या गाठाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी आपल्या भावना शासनाला काळविण्याचे लेखी आश्वासन दिल्यावरच हा जमाव बाहेर पडला. सरकारने अरक्षणाच्या बाबतीत लवकर निर्णय नाही घेतला तर शासकीय कामकाज बंद करण्याचे पुढचे पाऊल उचलले जाणार असल्याचे आंदोलकाकडून सांगण्यात आले.
 
Web Title: maratha kranti morcha agitation in ausa