मराठा महामोर्चाच्या आंदोलकांची प्रकृती गंभीर

Maratha-Kranti-Morcha
Maratha-Kranti-Morcha

हिंगोली - मुंबई येथे मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा क्रांती महामोर्चाच्या आंदोलनातील चौघांची प्रकृती गंभीर झाली आहे. यामध्ये दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, क्रांती महामोर्चाचे समन्वयक हिंगोली येथील प्रा. संभाजी पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

राज्यात मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती महामोर्चाचे पदाधिकारी २ नोव्हेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. सुमारे पस्तीस जण आमरण उपोषण करीत आहेत. महामोर्चाचे समन्वयक प्रा. पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी काळी दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या वेळी काळ्या पट्ट्या बांधल्या, तर काळे झेंडेदेखील लावले. दरम्यान, या आंदोलनातील चौघांची प्रकृती बिघडली असून अनंत मोरे, संजय घोरपडे यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com