नांदेड - आमदुऱ्यात आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील  गोदावरी नदीपात्रात शुक्रवारी (ता. 27) सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार होते मात्र, पोलिसांनी हे आंदोलन रोखल्याने चिडलेल्या आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाले.तसेच आंदोलक आणि पोलिसही जखमी झाले. सध्या आमदुरा तील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी आश्रुधूरांच्या नळकांड्या व रबरी बुलेट्स चा वापर करून जमाव पांगविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशाेर मीना यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. दगडफेकीत 15 पोलिस जखमी झाले आहेत तर दहा पोलिस गाड्या आंदोलकांनी फोडल्याची माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी पत्रकारांना माहिती दिली... पोलिसांवर तर 20 आंदोलक जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांनी कोंम्बींग आॅपरेशन राबवून 30 ते 40 कार्यकर्त ताब्यात घेतले आहेत. आश्रुधूरांच्या नळकांड्या आणि रबरी बुलेट्सचा वापर करण्यात आला.आंदोलनाच्या ठीकाणी येण्यासाठी आंदोलकांनी वापरलेल्या 100 ते 150 दुचाकी पोलिसांनी जप्त करुन नांदेडला रवाना केल्या आहेत. या आंदोलनाची कल्पना काल रात्रीच मिळाल्या नंतर पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता आणि मुदखेड ते नांदेड ही वाहतुक ब्राम्हणवाडा मार्ग वळविण्यात आली होती दरम्यान, या दगडफेकीत एका पोलिसाला फीट्स आल्याने नांदेड ला हलविण्यात आल्याचे समजते.. 

Web Title: maratha kranti morcha agitators destroy police van