Maratha Kranti Morcha औरंगाबादेतील औद्योगिक वसाहती बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादेतील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींमधून मोठा प्रतिसाद मिळाला. कामगारांच्या वाहनांना आल्या पाऊली माघारी फिरावे लागल्याने उद्योगांनाही काम थांबवावे लागले. 

मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ) पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील औद्योगिक वसाहती शत प्रतिशत बंद आहेत. वसाहतींच्या चौकांमध्ये आंदोलकांनी ठिय्या करून बसलेल्या आंदोलकांनी कामगारांच्या वाटा रोखुन धरत त्यांना कंपनीत जाण्यापासून रोखले. सकाळी पहिल्या सत्राच्या शिफ्टपासूनच या वाहनांना माघारी पाठवण्यात आल्याने बजाज कंपनीमध्ये सुद्धा मनुष्यबळ पोचू शकले नाही. एरव्ही सकाळी नऊ वाजता गजबजून जाणाऱ्या नगर महामार्ग मात्र शुकशुकाट पसरलेला आहे. सीमेन्स, ओएसीस चौकात आंदोलक थांबल्याने अनेक उद्योजकांना परिसरातील खेड्यांमधून परतीची वाट धरावी लागली.

महाराष्ट्र बंद लाईव्ह :

Maratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा

Maratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद

Maratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'

Web Title: Maratha Kranti Morcha Aurangabad MIDC bandh Maharashtra Bandh