तर भिडेंना बेदम चोप देऊ - मराठा क्रांती मोर्चा

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 11 जुलै 2018

औरंगाबाद : जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या मनुची तुलना मनोहर भिडे हे संतांसोबत करीत आहेत. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या भिडेंनी संतांसह महापुरुषांबद्दल जर आता काही दरी निर्माण करणारे वक्‍तव्य केले तर त्यांना रस्त्यावर पकडून बेदम चोप देऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (ता. 11) येथे दिला. तसेच मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करीत निषेधही नोंदविण्यात आला. 

मागील काही दिवसांपासून भिडे करीत असलेल्या वक्‍तव्याचा मराठा क्रांती मोर्चातर्फे सिडको परिसरात चांगलाच समाचार घेण्यात आला. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मराठा क्रांती मोर्चासह मराठा मावळा संघटनेतर्फेही मनुस्मृती पाण्यात बुडवत तसेच मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करीत भिडेंचा निषेध करण्यात आला. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की कधी आंबा तर कधी मनु अशा विषयावरून समाजात जातीय बिजे रोवण्याचा भिडेंचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. मनुस्मृती ग्रंथात मनु या जातीवादी मानसाने देशात जातीयवादाला खतपाणी घातले आहे. जागरुक झालेल्या समाजापुढे भिडे चुकीचा इतिहास मांडू पाहत आहेत. जर तरुणांचे माथे भडकले तर त्यांना रोखणे कठीण होईल. याचा भिडेंना समर्थन असलेल्या सरकारनेही विचार करावा. एकीकडे संतांनी या जगाला सर्वधर्म समभाव, अशी शिकवण दिली. तर दुसरीकडे भिडेंसारखा कथीत 'समाज सुधारक' संतांना कमी लेखत आहे. जर यापुढे भिडेंनी महापुरुषांच्या नावे गरळ ओकणे बंद केले नाही तर त्यांना रस्त्यावर बेदम चोप देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

आंदोलनात रविंद्र काळे पाटील, रमेश केरे पाटील, संजय सावंत, सुनील कोटकर, ज्ञानेश्‍वर गायकवाड, अप्पासाहेब कुढेकर, शैलेस भिसे, अशोक मोरे, नितीन कदम, विजय बेंबडे, निलेश धस, संकेत शेटे, विशाल पाटील तसेच मराठा मावळा संघटनेच्या आंदोलनात हनुमंत कदम, विजय म्हस्के, पंढरीनाथ गोडसे, छाया मेहर, भारत कदम, निवृत्ती मांडकीकर, सोमनाथ पवार, सुरेश कोंडके, बालू पठाडे, पुरुषोत्तम झळके, विजयसिंह महेर, अभिलाष इथापे, अश्‍विन काकडे, संदीप काळे, अशिष मुळे, संतोष देवरे, साहेबराव शिंदे, भाऊसाहेब पंडीत, सुधाकर शिंदे, आकाश म्हस्के, विशाल जाधव, वैभव व्यवहारे, किरण पांडव, शिला खोतकर, वंदना वायकोस आदींचा सहभाग होता.

Web Title: maratha kranti morcha criticize sambhaji bhide's statement