Maratha Kranti Morcha : अहमदपूरमध्ये अग्निशामक दलाची गाडी फोडली

प्रा. रत्नाकर नळेगावकर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

अहमदपूर (जि. लातूर) : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवार (ता. 9) रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील गावातून सकाळी सात वाजता मराठा युवक मोठ्या संख्येने शहरात जमत होते.

अहमदपूर (जि. लातूर) : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवार (ता. 9) रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील गावातून सकाळी सात वाजता मराठा युवक मोठ्या संख्येने शहरात जमत होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गुरुवारी (ता.9) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याचे पडसाद शहरात बुधवारी रात्री पासून पडत होते. लोकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची वर्दळ बुधवारी रात्री होती. गुरुवारी शहरातील प्रत्येक रस्त्यावर वहातूक कोंडी करण्यात आली. बाजार पेठांमध्ये कडेकोट बंद, सर्व शैक्षणिक संस्थाना सुटी, सकाळी सात वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलनकर्ते शिवाजी चौकातील ठिय्यात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी लातूर-नांदेड राज्य महामार्गावर शहरातील रेड्डी पुलाजवळ आंदोलकांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास वाजता टायर जाळून रास्ता कोंडी केली.

टायरला लागलेली आग विझवण्यासाठी जात असलेल्या नगरपालिकेच्या अग्नीशमन वहानावर सकाळी अकराच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली. वाहनाच्या काच फोडण्यात आल्या. यात चाळीस ते पंचेचाळीस हजारांचे नुकसान झाले असून या घटनेत अग्नीशमन अधिकारी नागनाथ उप्परबावडे, माधव पानपट्टे, वाहन चालक रियाज पठाण व फायरमन प्रशांत गायकवाड, कैलास सोनकांबळे, अजित लाळे व प्रकाश जाधव किरकोळ जखमी झाले आहेत.
 

Web Title: Maratha Kranti Morcha : Fire Brigade vehicle broke in ahamadpur